Teacher dances on thirsty सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अनेक जण अगदी मनमोकळेपणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून बिनधास्त डान्स करताना दिसतात. यात अनेकदा शाळेतील मुलांचेसुद्धा डान्स व्हिडीओ व्हायरल होताना आपण दिसतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक शिक्षिका विद्यार्थ्यांना डान्सच्या स्वरूपात तहानलेल्या कावळ्याची गोष्ट सांगताना दिसत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्यांना डान्स करत एक कविता शिकवीत आहे. लहानपणी आपण तहानलेल्या कावळ्याची गोष्ट नक्कीच वाचली असेल. अनेकदा विद्यार्थ्यांना गाणं, कविता आदी गोष्टी डान्सच्या स्वरूपात करून दाखवल्या, तर लगेच लक्षात राहतात. असाच प्रयोग या शिक्षिकेने करून पाहिला आहे.
‘एक कव्वा प्यासा था’ या कवितेवर ती डान्स स्टेप्स करीत विद्यार्थ्यांना शिकवत आहे. मग विद्यार्थीदेखील त्या शिक्षिकेचं अनुकरण करून डान्स करताना दिसत आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
Teacher dances on thirsty व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “जर असे शिक्षक असतील, तर प्रत्येकाला अभ्यासाची गोडी लागेल.” तर दुसऱ्यानं, “मॅडम, तुम्ही तर खूप चांगलं शिकवताय. आम्हालादेखील इथे अॅडमिशन घ्यायचंय” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “माझीपण शिक्षिका अशीच असती, तर मी रोज शाळेत गेलो असतो.”